राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांना ‘ईडी’चे समन्स

0

नवी दिल्ली: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा सहकारी दिवंगत इक्‍बाल मिर्ची याच्या बेकायदेशीर संपत्तीशी संबंधित “मनी लॉंडरिंग’ प्रकरणाच्या चौकशीप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

“युपीए’ सरकारच्या राजवटीत माजी केंद्रीय मंत्री असलेले पटेल यांना 18 ऑक्‍टोबरला मुंबईत उपस्थित राहण्यास सांगितले गेले आहे. पटेल आणि त्यांची पत्नी आणि मिर्चीची पत्नीने वाढवलेल्या रिअल इस्टेट कंपनीतील कराराच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) “प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग’ कायद्यांतर्गत पटेल यांचे निवेदन नोंदवणे अपेक्षित आहे. विमान वाहतुक घोटाळ्याशी संबंधित आणखी एका “मनी लॉन्डरिंग’ प्रकरणात “ईडी’ने पटेल यांची या आधीच चौकशी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.