मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असतानाच, आज राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जोरदार दणका दिला. पक्षाचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, मात्र भाजपने तेथे आपला झेंडा रोवला आहे. विजय घोडमारे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून घोडमारे नाराज होते.