भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची ऑफर होती, शिवाय, राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. भुसावळ येथे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादीवाले माझ्याकडे एबी फॉर्म घेऊन आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली. अखेर राष्ट्रवादीला शिवसेनेकडून उसनवार घेतलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. त्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला, पण त्याने अद्याप शिवसेना सोडली नाही, पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला नाही, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.
आपल्यावर अन्याय झाला हे खरं आहे, त्यासाठी माझा गुन्हा काय हे मी पक्षाला विचारणा करणार असल्याचंही खडसे म्हणाले. पण ज्या पक्षाने मला मंत्री बनवलं, विरोधी पक्षनेता बनवलं, संपूर्ण महाराष्ट्राला माझी ओळख दिली, त्या पक्षाला मी सोडून जाणं हे माझ्या मनाला न पटणार होत असं सांगताना एकनाथ खडसे म्हणाले.