रावेर हत्याकांड ; आरोपींच्या शोधांसाठी तीन पथक रवाना !

0

रावेर : तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतातील घरामध्ये चार भावडांचा कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची निघृन घटना आज घडली. या घटनेचा तपास लावण्यासाठी नाशिक परिक्षात्राचे पोलिस महासंचालकाच्या सुचनेनूसार पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुढें यांनी पोलीस दलाचे तीन पथक तयार केला असून घटनास्थळील पुरावे, फॅारेन्सीग टिम, फिंगर प्रिंट पथकाडून घटनास्थळाचे तपास करण्याचे काम सुरू आहे. तसेच आरोपीच्या शोधासाठी मध्यप्रदेश येथे एक तर दोन पथके इतर दोन ठिकाणी रवाना झाली आहे. तसेच या घटनेबाबत खासदार रक्षा खडसेंनी देखील पोलिस अधीकाऱयांशी चर्चा केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांचा शोध लावण्याच्या सुचना दिल्या आहे.

रावेर शहरालगत बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्‍तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य राहतात. ते आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. घरात सईता ( वय १२ वर्ष) रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन वय ३ वर्ष ) या चौघां भावंडाचा खून कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या करण्यात आली. गंभीर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱयांसह पोलिस अधिकारी हे देखिल घटनास्थळी हजर झाले आहे. तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनी देखील घटनेची माहिती घेवून पोलीस अधिक्षक डॉ. मूढें यांना तपासाच्या सुचना तसेच आरोपी शोधण्याच्या पथकांचे नमणूक करण्याच्या सुचना दिल्या आहे. त्यानुसार पोलिस अधिक्षकांनी एसआरटी पथक, तसेच चार प्रथम दर्जाचे पोलिस निरीक्षक, फॅारेन्सीक, श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आदी पथकांकडून या घटनेचा तपास वेगाने पोलिसांनी सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.