भुसावळ | प्रतिनिधी
मध्य रेल भुसावळ विभागाने विना तिकिट, अनुचित तिकिट प्रवासाला थांबविण्यासाठी भुसावळ विभागातील रावेर स्थानकावर आज दि.२२ जुन रोजी(बस रेड चेक) आकस्मिक तपासणीचे आयोजन केले होते.
सदर मोहीम वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या उपस्थितित आज करण्यात आली.या बस रेड तपासणीत एकुण ३६ तिकिट तपासणीस व १० रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी सहभागी झाले होते. यात गाड़ी क्र.११०७८ झेलम एक्सप्रेस,सचखंड एक्सप्रेस,
, १२७८० गोवा एक्सप्रेस , ११०५६ गोदान एक्सप्रेस , १५०१८काशी एक्सप्रेस,१२३३५ भागलपुर एक्सप्रेस ,१५०६५ गोरखपुर- पनवेल एक्सप्रेस ,१२५३३पुष्पक एक्सप्रेस,१२६२८ कर्नाटका एक्सप्रेस, १३२०२ जनता एक्सप्रेस,११०१५ कुशीनगर एक्सप्रेस , ११०५७ पठानकोट एक्सप्रेस , ११०९३महानगरी एक्सप्रेस, १२१६७ वाराणसी एक्सप्रेस, ११०६७साकेत एक्सप्रेस या गाडया रावेर स्थानकावर थांबवून तपासणी करण्यात आली.या मोहीमेत ७२७ प्रवासी अनियमित प्रवास करताना पकडण्यात आले त्यांच्याकडून एकूण ३लाख९२ हजार १२० रु.,विना तिकिट प्रवास करताना १२५ केसेस मध्ये ९० हजार २२० रू.तर अनियमित प्रवास करताना ५९९ केसेस मध्ये २ लाख ९९ हजार ७०० रु.तसेच विना बुक पार्सल सामान वाहतुकीत ३ केसेस करुन २ हजार २०० रु.दंड वसूल करण्यात आला.या मोहिमेत मंडळ मुख्य तिकीट निरीक्षक हरविंदर अहलुवालिया ,एन.पी. पवार,बी.एस.महाजन,व्ही.डी. पाठक,व्ही.के.सचान,हेमंत सावकारे,एस.ए.दहीभाते,एस.एन चौधरी,धीरज कुमार,पी.व्ही. ठाकूर ,एम.के.श्रीवास्तव,राजेंद्र प्रसाद ,ए.एस.गायकवाड,पी.के. चतुर्वेदी,ए.के.गुप्ता,दीपक शर्मा,पी.एम.पाटील,एम.के.राज, उमेश कळोसे,ए.के.सोनी,एस.एस. व,के.एम.मालपाणी,के.पी.मीना,व्ही.एस.पाटील,आर.पी.राम,एस.आर.सिंग ,कुमार गौरव व अन्य तिकिट तपासणी कर्मचारी सहभागी होते.रेल्वे प्रवास करताना अधिकृत तिकीट घेवूनच प्रवास करावा ही मोहीम नेहमी सुरू राहणार असल्याचे भुसावळ वाणिज्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.