रावेर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

0

रावेर :-रावेर शहराची हद्द वाढ केल्या बद्दल आभार मानून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी रावेरचे माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदनाद्वारे केली आहे

रावेर ग्रामीण भागातील रहिवाशी वस्तीचा नगरपालिका हद्दीत समावेश करण्यासाठीची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी आ हरीभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका निभावल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी रावेर माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन आणि श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे यांनी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले

या निवेदनात त्यांनी नमूद केले की, रावेर शहराची हद्दवाढ करून येथील नागरी वस्त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल रावेरकरांच्या वतीने आभार मानण्यात आले.

याच प्रमाणे या वाढीव वस्त्यांचा आणि रावेर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी याच प्रमाणे रावेर विधानसभा मतदार संघातील शेतकरी हिताचा महाकाय जल पुनर्भरण योजनेचे काम देखील मार्गी लावावे व मंत्रिमंडळ विस्तारात आ हरीभाऊ जावळे यांना स्थान द्यावे आदी महत्वाच्या मागण्या नमूद करण्यात आल्या होत्या.

सदर भेटीत ना. फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.