मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-आज मुक्ताईनगर येथील युवा सेना कार्यालय येथे रावेर लोकसभा मतदार संघाचे सहसंपर्क प्रमुख मा.श्री. विनोद चव्हाण साहेब यांनी मुक्ताईनगर येथील युवा सेना कार्यालयाला भेट दिली आणि युवा सेनेच्या कार्याचा आढावा घेतला.
व युवा सेनेच्या कार्याचा आनंद व्यक्त केला. तसेच युवसेना उपजिल्हा प्रमुख पवन भाऊ सोनवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विनोद चव्हाण साहेबांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना ता. प्रमुख छोटू भाऊ भोई,जिल्हा संघटक अफसर भाऊ खान,उपतालुका प्रमुख प्रफुल पाटिल,नगरसेवक वसंत भलभले,
युवासेना शहर प्रमुख आकाश सपधारे,रविंद्र दांडगे, राहुल हरणे, सागर भोजने, सुमित तळेले, गणेश भोई, पल्लव राजपूत, सागर जाधव, प्रफुल वंजारी,शुभम तायडे, गणेश भोजने, गोलू काकड़े, विकी कोळी, दिपक जोशी.व समस्त शिवसेना व युवासेना परिवार यांची उपस्थिती होती.