रावेर | येथील दी रावेर पीपल्स बँकेतील लिपिक पदाच्या भरतीबाबत तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सहाय्यक निबंधकांसमोर चौकशीसाठी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांना परवानगीच्या सर्व कागदपत्रांसह बोलावण्यात आले होते. मात्र, बँकेने चौकशीसाठी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे ७ एप्रिलला चौकशी होईल.
येथील रावेर पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेच्या लिपिक पदाच्या भारतीवरून वाद सुरु झाला आहे. पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी उमेदवाराने केली होती. मात्र, ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्याने पंकज सवर्णे यांनी डीडीआरकडे भरती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार डीअडीआरने याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांना पत्र देऊन बुधवारी येथील सहाय्यक निबंधकांसमोर सुनावणी व चौकशी ठेवली होती.
मात्र, बँकेने मार्च एंडिंग असून वसुलीचे काम सुरु असल्याचे कारण देत चौकशीसाठी १५ दिवसांची मुदत मागितली होती. सहकार विभागाने प्रकारची पुढील सुनावणी ७ एप्रिलला ठेवली आहे.