रावेर दंगलीतील जखमीचा मृत्यू

0

रावेर । देशात जनता कर्फ्यू पाळला जात असताना रावेर शहरात दोन गटात तुफान दगफेक करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. दरम्यान, या दगडफेकीत जखमी झालेल्या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. यशवंत मराठे (वय-४५,रा. संभाजी नगर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर रावेर शहरात दोन दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

रावेरातील शिवाजी चौकात- मन्यारवाडा मशिदीजवळ क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. दंगल होताच पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अंधारात पोलिसांना घटनास्थळ गाठण्यात विलंब झाला. पोलिसांनी तीन फैरी झाडल्यानंतर दंगल आटोक्यात आली.

दरम्यान रावेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. प्रार्थना स्थळावरून आलेल्या जमावाने शिवाजी चौकात जोरदार दगडफेक झाल्याने, दोन्ही बाजूने तुफान दगड गोटे एकमेकांवर भिरकवल्याने जोरदार दंगल भडकली. यात संतप्त जमावाने शिवाजी चौकातील व बारी वाड्यातील पाच मोटार सायकली एक टाटा मॅजिक जाळून भक्ष्य केल्या. रात्री १२ वाजता प्रांतअधिकारी यांनी ४८ तासासाठी संचार बंदी घोषित केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.