रावेरातून डॉ. उल्हास पाटलांचे नाव कॉंग्रेसकडून निश्चित?

0

रावेर :- रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेस आघाडीला देणार असल्याचे निश्‍चित झाले. या संदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पक्षाचे उमेदवार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना कामाला लागण्याचे संकेत देण्यात आले आहे. तसेच त्यांनी प्रचारासही सुरवात केल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या एक-दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

रावेरच्या जागेवरून राष्ट्रवादी व कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत. यातील एक जागा कॉंग्रेसला न सोडल्यास जळगावात राष्ट्रवादीचे काम करणार नाही, असा पवित्र कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. यावेळी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जळगाव येथील जागा कॉंग्रेसला देण्याचे निश्‍चित झाले. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची या मतदार संघात गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु केली होती. त्यांच्या नावाची घोषणा येत्या एक-दोन दिवसात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.