जळगाव ;- रावेर, सावदा येथे विविध ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खा. रक्षाताई खडसे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
याप्रसंगी उपस्थित आमदार हरिभाऊ जावळे, माजी खासदार उल्हास पाटील, जिप उपाध्यक्ष नंदूभाऊ महाजन, सावदा नगराध्यक्षा सौ. अनिताताई येवले, रावेर माजी नगराध्यक्ष व भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, रावेर पंस सभापती माधुरीताई पाटील, रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सावदा न पा गटनेते अजय भारंबे, सावदा माजी उपनगराध्यक्षा सौ.नंदाताई लोखंडे, नगरसेविका जयश्री नेहेते, नगरसेविका लीना चौधरी, नगरसेविका करुणा पाटील, सावदा शहराध्यक्ष पराग पाटील, जगदीश बढे, गजू लोखंडे सर, नगरसेवक असगर सय्यद, गोपाळ नेमाडे, लीनाताई भालेराव, नजीम शेख, सुखदेव तायडे व इतर कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .