Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी पडद्याच्या आड
    मनोरंजन

    रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी पडद्याच्या आड

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2021Updated:October 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

    सुप्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी आज या जगाचा निरोप घेतला. अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 83 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात.

    ‘रावणा’ची भूमिका साकारल्यानंतर त्याची टीव्ही इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख बनली होती. या भूमिकेमुळे तो इतका लोकप्रिय झाले की, घरोघरी मुले त्यांच्यासारखी वागायला लागली. लंकेश हैं हम. म्हणण्याची त्यांची शैली प्रत्येक घरात प्रसिद्ध झाली. संवाद म्हणण्याची त्यांची शैली आजही लोकांच्या आठवणीत आहे. असे म्हटले जाते की, अरविंद त्रिवेदीने आपल्या कारकिर्दीत फक्त एका रावणाची भूमिका केली होती, ती नकारात्मक होती. याआधी त्यांनी गुजराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुमारे 250 चित्रपट केले होते, परंतु या सर्वांमध्ये ते अतिशय सकारात्मक भूमिकेत दिसले. अरविंद त्रिवेदी गुजराती चित्रपटात अधिक सक्रिय होते.

    कोरोना लॉकडाऊनच्या काळात रामायण ही मालिका टीव्हीवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. त्या काळात अरविंद त्रिवेदी आजारी असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या मृत्यूच्या अफवाही पसरल्या होत्या. अरविंद त्रिवेदींच्या मृत्यूच्या अफवा या वर्षी मे महिन्यातही उठल्या होत्या, पण त्यावेळी पुतणे कौस्तुभ यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण देत खोटे वृत्त न पसरवण्याची विनंती केली होती.

    अरविंद त्रिवेदींनी किमान 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2002 मध्ये त्यांना केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. याशिवाय, ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले आणि पाच वर्षे पदावर राहिले होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Arvind Trivedi Death Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif