रायसोनी महाविद्यालयात येत्या गुरुवारी व शुक्रवारी महारोजगार मेळावा

0

जळगाव : रायसोनी इस्टीट्यूटच्या जॉब प्लेसमेंट मार्गदर्शन केंद्राच्या पुढाकाराने ता. ६ व ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविध्यालयात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १५ च्या वर विविध कंपन्या त्यांच्याकडील रिक्त सातशेवर जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेणार असूनयातून अंतिम निवड केली जाणार आहे.

 

रायसोनी इस्टीट्यूटच्या जॉब प्लेसमेंट मार्गदर्शन केंद्राद्वारे नियमितपणे येथे रोजगार मेळावे घेतले जातात. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळावी तसेच औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असलेले कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी या केंद्राद्वारे दुवा म्हणून काम करताना रोजगार मेळावे घेतले जातात. यात सुशिक्षित बेरोजगार व कंपन्यांच्या व्यवस्थापनाला व्यासपीठ देऊन दोन्ही घटकांना एकमेकांच्या निवडीची संधी दिली जात असते. येत्या शुक्रवारी होणाऱ्या निशुल्क मेळाव्यात लक्ष्मी अॅग्नी कॉम्प्नेट प्रा. ली., स्काय टेक प्रा. ली., टेक महिंद्रा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स, पार्किन्स इंडिया प्रा. ली., देवगिरी फॉरेन प्रा. ली., जस्ट डायल लिमिटेड, ओरंगाबाद ऑटो, संजीव ऑटो पार्ट, इक्लेक्स या व आदी कंपन्‍या व संस्थांमधील विविध ७०० च्या वर रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. 

 

पदवीधर, पदव्युत्तर, तंत्रनिकेतन, सर्विस इंडस्ट्री, टेक्निकल यातील कुठल्याही शाखेतील असलेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रायसोनी महाविध्यालय परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर मुलाखती घेतल्या जातील. कंपन्यातील रिक्त पदांची माहिती  https:/bit.ly/2TsHWID या वेबसाइटवर उपलब्ध असून या लिंकवरच  ऑनलाइन नाव नोंदणी करुन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तेजस कुंभारे, नैना जुनानकर यांच्या दूरध्‍वनी क्रमांक- ९९७५७७६८४४, ७७७४००९४८४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्लेसमेंट ऑफिसर तन्मय भाले, पंकज पाटील, हर्षद पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.