रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

0

जळगाव : जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागाच्या वतीने “आयओटी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मितु स्कीनॅालॉजि पुणे येथील प्रा. अनिकेत थोरवे यांचे मार्गदर्शन उपस्थित विध्यार्थ्यांना लाभले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए जी. मॅथ्यू होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी केले. कार्यशाळेचे आभार प्रा. हिरालाल साळुंखे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. स्वाती पाठील यांनी केले तर या चर्चासत्रात प्रा. तुषार पाटील, प्रा. तुषार वाघ, प्रा. शीतल जाधव उपस्थित होते. कार्यशाळेत डिप्लोमा संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील  विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. स्वप्नील देशमुख, प्रा. हेमंत चौधरी, प्रा. कैलास पाटील, व प्रा. गणेश धानोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.