रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅटफ्लॉग व्हिज्युअल इंडिकेटरची निर्मिती

0

जळगाव | प्रतिनिधी 
येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील अंतिम वर्षातील निकिता फिरके, कोमल खत्री, आरोही जोशी व भूषण कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी आय.ओ.टी.बेस गॅटफ्लॉग व्हिज्युअल इंडिकेटर उपकरणाची निर्मिती केली आहे. या संशोधन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वाहन चालकाला आपले वाहन पूर्णपणे मर्यादेत ठेवण्यास मदत होऊ शकते. लहान मोठी अवजड वाहनांमध्येही या तंत्रज्ञाचा वापर करता येऊ शकतो आणि वायुप्रदूषण होण्यास निर्बंध लावू शकतो. संशोधन प्रकल्प तयार करण्यासाठी फक्त १५ हजार इतका खर्च आला आहे. संशोधक विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत.
या सिस्टीमची निर्मितीसाठी जीपीएस सिस्टीम, फ्लोट सेन्सर, टेम्प्रेचर सेन्सर, आर्डीनो, गॅस सेन्सर, पॉवर सप्लाय, एल.सी.डी.स्क्रीन वापरण्यात आले आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना ५ महिन्याचा कालावधी लागला आहे.
उपकरणाच्या प्रमुख विशेषतः म्हणजे या तंत्रज्ञानामुळे वाहन चालकाला इंजिनमधील तापमान, चारचाकी पासून पुढील वाहनातील तापमान प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास त्याच्या सूचना देईल. वाहनातील इंधन व्यवस्थापन स्थिती वेळोवेळी वाहनचालकास देत राहील इंधनसाठा कमी झाल्यास वाहन पुढील किती कि.मी.अंतर चालवू शकतात याची पूर्व सूचना देईल. वाहनातील इंधन साठा संपत असेल आणि पुढील पेट्रोल पंपाचे अंतर किती कि.मी आहे याची देखील माहिती घेता येईल. जी.पी.एस तंत्रज्ञान या उपकरणात देखील बसविल्यामुळे वाहनाची अद्ययावत स्थिती संबंधित नावासहित दाखवेल तसेच सी.ओ.टू व मोनोस्काईड वायूगॅस निर्माण होण्याची पूर्व सूचना निर्देशित करते. यामुळे अपघात, वाहन चोरी सारख्या समस्या तसेच निसर्गातील वायू प्रदूषण होणार नाही.
सध्या वातावरणात प्रामुख्याने वायुप्रदूषण खूप अधिक प्रमाणात होत आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताची राजधानी दिल्ली शहर. वायुप्रदूषण होत असल्यामुळे त्वचेचे विकार, श्वसनासंबंधी विकार दिवसागणिक वाढत आहेत. दिल्लीत यामुळे चारचाकी वाहनांची मर्यादा संपल्यानंतर वापरण्यास सक्त मनाई आहे. तसेच वाहन चोरी देखील होत आहे. वाहनातील तापमानामुळे वाहनांना लागणारी आग, वाढत चालणारी वायुप्रदूषणाची ही समस्या अशा विविध समस्या कशा प्रकारे सोडविता येतील हा विचार लक्षात घेऊन हे संशोधन करण्यात आले. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रा.सोनल पाटील, प्रा. शीतल जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य. डॉ.ए.जी.मॅथ्यु, विभागप्रमुख प्रा.सोनल पाटील, प्रा.हिरालाल साळुखे, प्रा.स्वाती पाटील, प्रा.गणेश धनोकार यांनी अभिनंदन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.