Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»रायगडात म्युकर मायकोसिसचा शिरकाव
    महाराष्ट्र

    रायगडात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

    By May 21, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पेण : कोरोनाच्या महमारीने आधीच थैमान घातले असताना जिल्ह्यात आता म्युकर मायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात पनवेल दोन तर खोपोली एक असे तीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी एका रुग्णाचा म्युकर मायकोसिस आजाराने मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. म्युकर मायकोसिस आजारामध्ये स्वतःची काळजी घेणे गरजेचे असून घरगुती तयार केलेल्या मास्क पूर्ण ड्राय झाल्यानंतरच वापरा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. जिल्ह्यात या आजाराच्या इंजेक्शनच्या साठा जिल्हा रुग्णालय आणि पनवेल महानगर पालिका रुग्णालयात उपलब्ध आहे असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव हा अजून सुरूच असून रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र त्यासोबत आता म्युकरमायकोसिस महमारीनेही डोके वर काढले आहे. राज्यात या आजाराचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये दोन आणि खोपोलित एक असे तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन पैकी एका रुग्णाचा शुक्रवारी या आजाराने मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिस आजाराच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

    स्वतःची स्वच्छता राखण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहनकोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांना मधुमेह वा इतर गंभीर आजार असणाऱ्यांना म्युकर मायकोसिस आजार जडत आहे. त्यामुळे कोरोना उपचार घेण्यास आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या मागील आजाराची माहिती डॉक्टरांना देने गरजेचे आहे. जेणे करून औषधोपचार करणे सोपे जाऊ शकते. नागरिकांनी मास्क वापरताना कापडी मास्क वापरत असतील तर ते धुतल्यानंतर पूर्ण ड्राय झाल्यानंतरच वापरायचे आहे. अन्यथा फंगस इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची स्वच्छता योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्दश दिले आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif