रायगडच्या विकासासाठी २० कोटी : मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा

0

मुंबई: राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली.यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याच्या विकासासाठी २० कोटी रुपये वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केला आहे. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे सांगत हा निर्णय घोषित करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

राज्याच्या जनतेला महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून चांगले सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असून तीन पक्षांच्या हे सरकार राज्यातील सामान्य माणसासाठी काम करेल असे ठाकरे म्हणाले. राज्यात निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्याचे काम आपले सरकार करेल असेही ठाकरे म्हणाले.

दुसरी बाब अर्थातच शेतकऱ्यांची महाराष्ट्रातला शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. मी मुख्य सचिवांना असे निर्देश की जी मदत दिली आहे गेली त्याचं वास्तव चित्रण द्यावं. एक ते दोन दिवसात ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर मोठी मदत करणार येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे पदरात काही पडलेलं नाही हे आम्हाला समजलं आहे. असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.