अयोध्या : अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची अख्खा देश वाट पहात आहे. त्याची मुहूर्तमेढ आज भूमिपूजनाने होणार आहे. त्यामुळे अवघी अयोध्या नगरी फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने झळाळून निघाली आहे. शहरात केंद्रीय सुरक्षा दलांनी तळ ठोकला असून या पुरातन शहराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. अवघ्या देशांत या निमित्ताने उत्साहाचे भरते आले असून ठिकठिकाणी दीपोत्सव आणि रांगोळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.