अभिनेत्री सोनाली बेंद्रेला केले मृत घोषित
मुंबई, दि. 7 –
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्यात अडकलेल्या भाजप आमदार राम कदम यांच्या संकटांमध्ये आता नव्याने भर पडली आहे. परदेशात उपचारासाठी गेलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधन झाल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. अगोदर संकटाची मालिका कायम असताना रामाने पुन्हा संकटात एक कदम टाकले आहे.
हिंदी व मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री व एकेकाळी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाची बेंद्रे पडद्याआड, असे ट्विट त्यांनी केले होते. वादग्रस्त विधाने व कृत्य यामुळे राम कदम सातत्याने चर्चेत राहतात. महिलांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात संतापाची लाट उसळली असताना आज पुन्हा सोनाली बेंद्रेच्या बाबतीत खोटी माहिती टाकून त्यांनी संकट ओढवून घेतले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post