खामगांव : रामनवमीच्या निमित्ताने शहरातील गोर गरीब व गरजूंना सानंदा परिवाराच्या वतीने सोशल डिस्टसिंग ठेऊन अन्नधान्य,मास्क व सॅनिटायझर किटचे आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक भुषण शिंदे,बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव तुषार चंदेल, सोशल मिडीयाचे अध्यक्ष आकाश जैस्वाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य राजेश जोशी सर उपस्थित होते.लॉकडाऊनच्या काळात पहिल्या टप्प्यात १० हजार गरीब परिवारांना अन्नधान्य व साहित्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.