राफेलचे भूतच भ्रष्ट सरकारला गाडेल – शरद पवार

0

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. राफेल विमानाची किंमत 500 कोटीहून १,६०० कोटींवर कसे जाते, असा आरोप करीत राफेलचे हे भूत भाजपा सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी हल्लाबोल केला. नांदेडला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी-रिपाई (गवई) गट, शेकाप व सीपीएमसह मित्र पक्षाच्या महाआघाडीची विराट संयुक्त प्रचारसभा बुधवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गोकुळनगर येथील इंदिरा गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ते बोलत होते.

‘खाऊंगा न खाने दुंगा’असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल विमानाच्या किंमती घोटाळ्याबाबत देशाला उत्तर द्यावे. राफेलचे भूतच या भ्रष्ट भाजपा सरकारला गाडेल, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

पवार म्हणाले, पुलवामा घटना ही देशावरचे संकट आहे. अशा संकटाच्यावेळी मतभेद विसरून आम्ही एकीचे दर्शन घडवतो असा लौकीक आहे. परंतु गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी व बैठकीस उपस्थित न राहता धुळे, यवतमाळ येथे प्रचारसभेत गुंतले होते. नोटबंदी नंतर आतंकवादी हल्ले कमी होतील असा दावा करण्यात येत होता.

व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे सहप्रभारी संपत कुमार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री बस्वराज पाटील, माणिकराव ठाकरे, जयप्रकाश दांडेगावकर, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, आ.डी.पी.सावंत, आ.अमिताताई चव्हाण, आ.अमरनाथ राजुरकर, आ.वसंतराव चव्हाण, आ.प्रदीप नाईक, फौजीया खान, शंकरअण्णा धोंडगे, रामराव वडकुते, बापुसाहेब गोरठेकर, नरेंद्र चव्हाण सह आदी उपस्थिती होते.

Leave A Reply

Your email address will not be published.