राधाकृष्ण विखे-पाटील भाजपात प्रवेश करणार नाही

0
33

मुंबई :– गेल्या काही दिवसापासून सुजय विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता त्याचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. आज पंतप्रधान मोदी यांच्या नगरमध्ये होणाऱ्या सभेत राधाकृष्ण विखे भाजपात प्रवेश करतील असे म्हटले जात होते. पण यासंदर्भात विखे भाजपात प्रवेश करणार नाहीत असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

ते पंतप्रधान मोदींच्या सभेला देखील उपस्थित राहणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. आज नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा निरंकारी भवनामागील सावेडी मैदानात होणार आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे नगर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here