राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात हायकोर्टात याचिका

0

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचं सांगत त्यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड.सतिश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली असून पक्षांतर बंदी असताना कुठल्याही नेत्याला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात मंत्री म्हणून जाता येणार नाही, असा तळेकर यांचा युक्तीवाद आहे. त्यामुळेच विखे पाटलांना दिलेलं मंत्रिपद बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीतील वादावादीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिपद देण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखेंना गृहनिर्माणपद दिलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेले मंत्रिपद बेकायदेशीर असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद का दिलं? याचं उत्तर सरकारनं द्यावं, असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, यामुळे राजकीय भ्रष्टाचार बोकाळेल असं देखील सतीश आळेकर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजपनं गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.