रात्री मला भेटायला बोलवून…; दिपाली चव्हाणांच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासे

0

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकरल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. चव्हाण यांच्या जवळ पोलिसांना सुसाईट नोट मिळाली असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिपाली चव्हाण यांनी उप वन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून  आत्महत्या केली असल्याची माहिती उघड झाली आहे. सुसाईटनोटमध्ये विभागीय वन अधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक रेड्डी यांच्या नावाने दिपाली चव्हाण यांनी पत्र लिहिले आहे.

कामाच्या बाबतीत काहीही खटकले तर शिवकुमार आपल्याला निलंबित आणि चार्जशीट करण्याची धमकी द्यायचे. अक्टोंबर २०२० मध्ये प्रेग्नेसीमुळे मी ट्रेक करू शकले नव्हते तर मला सलग तिन दिवस कच्च्या रस्त्यावरून फिरवलं. त्यात माझा गर्भपात झाला. पण तरीही मला सुट्टी दिली नाही.

सुसाईड नोटमध्ये काय?

दीपाली यांनी ज्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली, तेथे धारणी पोलिसांना सुसाईट नोट मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या नावे लिहिलेले हे तीन पानी पत्रात त्यांनी शिवकुमारकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सविस्तर लिहिले आहे.  प्रशासकीय जाच, रात्री-बेरात्री संकुल, अकोट फाट्यावर बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, सहकाऱ्यांदेखत होणारी अश्लील शिवीगाळ, शिवकुमार यांनी जाणूनबुजून जंगल फिरविल्याने गर्भपात झाल्याचे म्हटले आहे. आत्महत्येला शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई कराल, हीच शेवटची इच्छा, असे नमूद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.