जळगाव;-रात्री आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे क्लिनिक बंद केल्यानंतर आकाशवाणी चौकाकडे फिरायला निघालेल्या डॉक्टर महिलेच्या हातातून दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात भामट्यानी त्यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून वेगाने पळ काढल्याची घटना २१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , रिंगरोड परिसरातअसणाऱ्या हरेश्वर नगरातील रहिवाशी डॉ. नेहा राजेश सादरीया (वय-३४) ह्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी क्लिनीक बंद केल्यानंतर त्या आपल्या पतीसह शतपावली करतात.मात्र शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास डॉ. सादरीया ह्या एकट्याच शतपावली करण्यासाठी आकाशवाणी कडे जात होत्या. हॉटेल स्टेप इन जवळून जात त्यांनी कुणाला तरी फोन करण्यासाठी पर्स मधून मोबाईल काढला असता इतक्यात दुचाकीवरून भन्नाट वेगाने आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटयांनी स्वातंत्र्य चौकाच्या दिशेने पोबारा केला . याप्रकरणी
याप्रकरणी डॉ. नेहा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.