राणीचे बांबरुड येथील वयोवृद्ध व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्‍न

0

पाचोरा  :– तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील 60 वर्षीय वयोवृद्धाने सततच्या आजाराला कंटाळून शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्याचा प्रयत्‍न केला आहे. सिकंदर साडू तडवी (वय-60)असे या वृद्धाचे नाव आहे.

सिकंदर तडवी  हे गेल्या दोन वर्षांपासून सतत आजारी आहेत. त्यांनी आजाराला कंटाळून आज सकाळी बांबरुड शिवारातील शेतात पीक फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याचे नातेवाईकांना लक्षात आले. नातेवाईकांनी तात्काळ खासगी वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत अद्याप कुठलीही नोंद घेण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.