राज ठाकरेंचा आजचा लातूर दौरा रद्द

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा लातूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी तब्येतीच्या कारणावरून हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.

पक्षाने नवी भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे लातूर येथे ‘राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं’ आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर राज ठाकरेंचा हा पहिलाच दौरा होता मात्र आता तो पुढे ढकलण्यात आला आहे.

मराठवाड्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी हा दौरा मनसेसाठी महत्त्वपूर्ण समजला जातो. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोर जावं लागल्यानं पक्षानं आता कात टाकत हिंदुत्त्वाची कास धरली आहे. तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ 9 फेब्रुवारी रोजी मनसे मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.