Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे पहिले निवेदन जारी..
    मनोरंजन

    राज कुंद्रा प्रकरणावर शिल्पा शेट्टीचे पहिले निवेदन जारी..

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 2, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागील अनेक दिवसांपासून पती राज कुंद्रामुळे  खूप चर्चेत आली आहे. राज कुंद्राला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीबद्दल अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आज, प्रथमच तिने आपले मौन मोडत या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

    काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

    शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘हो ! गेले काही दिवस आव्हानात्मक होते, प्रत्येक गोष्टी.  खूप अफवा पसरल्या आणि आरोप झाले आहेत. माध्यमांनी आणि (नसलेल्या) हितचिंतकांनी माझ्यावर बर्‍याच अनावश्यक टिपण्या केल्या. बरेच ट्रोलिंग/प्रश्न विचारले. फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही. माझी भूमिका…मी अद्याप कोणतीही कमेंट केलेली नाही. आणि या प्रकरणात असे करणे टाळत राहीन, कारण ते न्यायालयीन प्रकरण आहे, म्हणून कृपया माझ्या वतीने खोटे कोट देणे थांबवा. एक सेलिब्रिटी म्हणून “कधीही तक्रार करू नका, कधीही खुलासा देऊ नका” या माझ्या तत्त्वज्ञानाची पुनरावृत्ती करेन. मी एवढेच म्हणेन की, ही चालू असलेली तपासणी न्यायालयीन असल्याने मला मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

    एक कुटुंब म्हणून, आम्ही आमच्या सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करत आहोत. पण, तोपर्यंत मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते – विशेषत: आई म्हणून – माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि तुम्हाला विनंती करते की, सत्यता पडताळल्याशिवाय अर्धवट माहितीवरून वक्तव्य करण्यापासून दूर राहा. मी कायद्याचे पालन करणारी एक भारतीय नागरिक आहे आणि गेली 29 वर्षांपासून खूप मेहनतीने काम करत आहे. लोकांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी कोणालाही निराश केलेले नाही. तर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी तुम्हाला विनंती करतो की, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करा. आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपया कायद्याला मार्ग दाखवू द्या.

    सत्यमेव जयते!

    – शिल्पा शेट्टी कुंद्रा

     

    https://www.instagram.com/p/CSEB7z0jiYZ/?utm_source=ig_web_button_share_sheet

     

    19 जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात अटक केली होती, ज्याला त्याच्या वकिलांनी बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. राज कुंद्राची अटक बेकायदेशीर आहे, या युक्तिवादाला उत्तर देताना सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले की, राज कुंद्राच्या अटकेचे खरे कारण या प्रकरणाचे पुरावे नष्ट करणे हे आहे. राज कुंद्राचे आयटी प्रमुख रायन थोर्पे  यांनाही पुरावे नष्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    latest news Raj Kundra Shilpa Shetty Kundra
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif