Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»राज्य सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
    ताज्या बातम्या

    राज्य सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

    By September 3, 2020No Comments42 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई । वंचित बहुजन आघाडी, भाजप, एमआयएमपाठोपाठ आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही मंदिर प्रवेशाचा मुद्दा हाती घेतला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील मंदिरं लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असा सवाल करतानाच सर्वात शेवटी मंदिरं उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. मंदिरं उघडण्याचा लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे.

    सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरू असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?, असा सवाल करतानाच ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif