मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे.
दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून गुढीपाडवासाठी सणानिमित्त गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यात सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.