राज्य विस्तारक कुणाल दराडे यांचे युवकांना निवडणुकात सहभागी होण्याचे आवाहन

0

अमळनेर (प्रतिनिधी) : युवा सेनेचे राज्यभर  जनसंपर्क अभियानास अमळनेर पासून शुभारंभ करण्यात आला.  युवा सेना आपल्या दारी हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे युवा सेना विस्तारक कुणाल दराडे यांच्या उपस्थितीत सानेगुरुजी वाचनालयात संपन्न झाला

यावेळी  विस्तारक कुणाल दराडे यांनी आगामी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद , नगरपालिका निवडणुकीत युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करून  युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच तालुकाध्यक्षपदी किशोर पाटील , शहराध्यक्ष पदी अमर पाटील , शहर कार्याध्यक्ष भूषण सनेर यांची व रखडलेल्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील , उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील उपजिल्हा प्रमुख  विश्वजित पाटील तसेच तालुक्यातील युवा सेना कार्यकर्ते हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.