राज्य पुरातत्व विभागाकडून मल्हारगड व पाटणादेवी परिसरात पाहणी

0

मल्हारगडाची होणार राज्याच्या किल्यांमध्ये नोंद ; सह्याद्री प्रतिष्ठानचा पाठपुरावा
चाळीसगाव ;- सह्याद्री प्रतिष्ठान च्य पाठपुराव्याने व आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून चाळीसगाव परिसरातील गड किल्यांची पाहणी करण्यासाठी २२ रोजी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक नाशिक विलास वाहणे तसेच तंत्र सहायक राज्य पुरातन विभाग जया वाहने, सचिन पगारे छायाचित्रकार यांच्या टीम ने चाळीसगाव परिसरातील गड किल्यांची पाहणी करण्यासाठी भेट दिली.

यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे, शरद पाटील, अजय जोशी आदी उपस्थित होते .
चाळीसगाव तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगेत कन्नड घाटाच्या मधोमध असलेल्या या गडाची संपूर्ण पाहणी यावेळी वहाने यांनी केली असता त्यांना गडाबद्दल बरीचशी माहिती यावेळी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिली . तसेच गडावरील अवशेष, मंदिर मुर्त्या, पाण्याचे टाके, बुरुज, तटबंदी व काही बारीक दगड पाहता गडाचा कालखंड व त्यावरील अवशेषांच्या बाबत बरीचशी माहिती सांगितली.
यानंतर पाटणादेवी येथे जाऊन तेथील हेमाडपंथी मंदिर व चंडिकादेवी मंदिर यांची पाहणी करून काही सूचनाही त्यांनी केल्या.समाधान पाटील, नरेंद्र जैन, सर्पमित्र राजेश ठोंबरे, भाऊसाहेब पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.