मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने 5 दिवसाचा आठवडा करण्याच्या निर्णयाला बुधवारी मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ही बातमी असून त्यांचा विकेंड मजेत जाणार आहे.
पाच दिवसाचा आठवडा करण्याचा प्रस्ताव सरकारकडे प्रस्तावित होता. मंगळवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यावेळी दररोज 45 मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करता येईल अशी भूमकी मांडली होती.
मंत्रिमंडळातील महत्वाचे निर्णय
मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा होणार
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता “बहुजन कल्याण विभाग”
बाल न्याय निधी गठीत करण्यास सरकारची मान्यता, 2 कोटींची तरतूद
राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
गेल्या अनेक वर्षांपासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी प्रलंबित होती. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून ही मागणी केली जात आहे.