जळगाव ;- राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी रईस शेख यांची प्रदेशाध्यक्ष सुभाष सांखला यांनी निवड जाहीर केली . तशा आशयाचे नियुक्तीपत्र रईस शेख यांना नुकतेच देण्यात आले . निवडीबाबत बोलताना रईस शेख यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार असून सामाजिक बांधिलकीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले . नियुक्तिबाद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे . यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरवडकर उपस्थित होते .