राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ; हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

0

पुणे | पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यांत कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अशात आता मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे.

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता बदलत्या हवामानाविषयी बोलायचं झालं तर गेल्या 6 महिन्यापासून वारंवार हवामानात बदल होत आहे.बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचं वातावरण तयार झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हवामानावर होतो.

 

यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण सध्या सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांवरही या अवकाळी पावसाचं सावट आहे.कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे.

 

देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.