राज्यावर अवकाळी पावसाचे ढग घोंगावणार ; १८ मार्चपासून सहा दिवस पाऊस

0

जळगाव  | येत्या आठवड्यात १८ मार्चपासून पुढील सहा दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे ढग घोंगावणार आहेत. सध्या विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज असून येत्या गुरुवारपासून संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस हाेऊ शकताे. दरम्यान, बुधवारपर्यंत मराठवाड्यावर असलेल्या चक्रीवादाळचे केंद्र शुक्रवारी उत्तर-मध्य महाराष्ट्रावर दिसून आले आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ताशी १० किलाेमीटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

पुण्यातील भारत माैसम विभागाने नाेंदवलेल्या निरीक्षणानुसार शुक्रवारी उत्तर-मध्य महाराष्ट्रावर चक्रीयवादळाचे केंद्र हाेते. दाेन दिवसांपूर्वी हे केंद्र मराठवाडा आणि लगतच्या प्रदेशावर हाेते. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढून काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. शुक्रवारी चक्रीवादळाचे केंद्र उत्तर-मध्य महाराष्ट्रावर दिसून आले. त्यामुळे वाऱ्याचा वेग ताशी १० ते १२ िकलाेमीटरपर्यंत वाढू शकताे. सध्या विदर्भात १३ मार्चपर्यंत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस हाेईल असा अंदाज आहे.

तर येत्या १८ मार्च ते २३ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला अाहे. या काळात ढगाळ वातावरण कायम राहणार असून साेबतच तापमान देखील वाढणार असल्याने उकाडा वाढेल. त्याचा परिणाम मानवी अाराेग्यवर हाेण्याची शक्यता आहे. खान्देशात आतापासूनच तापमानाचा पारा ३८ अंशांवर गेला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.