राज्यात पुन्हा पावसाचा इशारा.. ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आज दि १२ आणि १३,१४, १५  शनिवार, रविवार, सोमवार या चार दिवशी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने कोकणसह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

१२ ते १५ नोव्हेंबर रोजी दरम्यान पाच दिवस राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, पुणे सहीत मराठवाड्याचा दक्षिण भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

१२ नोव्हेंबर : सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड

१३ नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, पुणे, परभणी, हिंगोली

१४ नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली

१५ नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here