मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विजा चमकताना बाहेरची कामं टाळा, हवामान विभागाचा इशारा आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1444576520974917634?s=20
राज्यातील मोसमी पावसाचा अधिकृत हंगाम सप्टेंबर महिन्यात संपलाय आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्ह आहेत.