राज्यात पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज

0

पुणे : वातावरण बदलामुळे राज्यात पुढील ४ दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटासह गारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात 27, 28, 29 आणि 30 एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आज मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटसह पावसाचा इशारा देण्यात आला देण्यात आला आहे. तर कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भात 28 तारखेला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याचा ईशारा देण्यात आला.

29 आणि 30 तारखेला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.तर कोकण गोव्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.