Sunday, May 29, 2022

राज्यात दोन – तीन दिवसांत पावसाला होणार सुरूवात

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पुणे, लोकशाही न्यूज नेट्वर्क

- Advertisement -

राज्यात अनेक दिवसांपासून पावसाने हजेरी लावली नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. मात्र आता पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी अनुकुल हवामान होत आहे. दोन ते तीन दिवसांत पावसाला सुरूवात होणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. उद्या  कोकणात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

- Advertisement -

बिहार आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे निवळून जाणार आहे. उत्तर आंध्र प्रदेशपर्यंत किनाऱ्यालगत तसेच ओडिशामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारपर्यंत (दि. १७) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.मान्सूनचा  आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला असून, पूर्व भाग बंगालच्या उपसागराकडे सरकून सर्वसाधारण स्थितीत आला आहे.

मात्र राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम असून, तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. शुक्रवारी  सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे सर्वाधिक ३५.४ अंश सेल्सिअस, अकोला येथे ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, नागपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पुढे सरकला आहे. राज्यात १४ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज राज्यात उन्हाचा चटक्याबरोबरच उकाडाही कायम आहे. मंगळवारी (दि. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील कुडाळ येथे ७० मिलीमीटर, सावंतवाडी ६०, लांजा, संगमेश्वर प्रत्येकी ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दोडामार्ग, मुलदेसह मध्य महाराष्ट्रातील गगणबावडा, महाबळेश्वर येथे ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या