राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २३ ने वाढला ; रुग्णांची संख्या ८९१ वर

0

मुंबई:  महाराष्ट्रात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. राज्यात आज सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा 23 ने वाढला आहे. त्यामुळे राज्यात करोना रुग्णांचा आकडा ८९१ वर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ५२६ वर गेला आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 10  रुग्ण वाढले आहे. तर पुण्यात 4 रुग्ण आढळले आहे. तर सांगली 1, बुलडाणा 2, ठाणे 1, नागपूर 2 आणि औरंगाबादमध्ये 3 रुग्ण आढळले आहे.  राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तसंच कॅबिनेट मंत्र्यांसोबत त चर्चा करणार आहेत. काही कॅबिनेट मंत्री मुंबई बाहेर आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत.

दरम्यान, मुंबईतील धारावीमध्ये आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच कुटुंबातील दोघांना म्हणजे बापलेकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ७वर पोहोचली आहे. दरम्यान, संपूर्ण बलिगा नगर सील करण्यात आलं आहे. बलिगानगरमधील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आता हे दोन नवे रुग्ण आढळल्याने बलिगा नगरमध्ये खळबळ उडाली आहे. हे दोन नवे रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.