मुंबई : राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतात. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात २३,८१६ नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आज राज्यात २३,८१६ नवीन रुग्णांची नोंद कऱण्यात आली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ९,६७,३४९ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,५२,७३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
बुधवारी ३,९०६ रुग्ण बरे होऊन घरी परत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६,८६,४६२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ७०.९६ % एवढं झालं आहे.
राज्यात आज ३२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४८,८३,००६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,६७,३४९ (१९.८१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,११,२८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.