मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसून ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त वारंवार समोर येत आहे. आताही आणखी एका काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर इथले काँग्रेस आमदार रूतुराज पाटील यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथेच उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पाटील यांच्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी, लक्षणं असल्यास तात्काळ टेस्ट करून घ्यावी असं आवाहन आमदार रूतुराज पाटील यांनी केलं आहे.