मुंबई :- लोकसभा निवडणुकीतील आज दुसऱ्या टप्प्यामधील देशात ९५ जागांसाठी सकाळपासून मतदान सुरु आहे. यात महाराष्ट्रातील १० जागांसाठी मतदान होत असून दुपारपर्यंत ४६.६३ टक्के मतदान झाले आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात झालेले मतदानः बुलडाणा ४५.९४ टक्के, अकोला ४५.३९ टक्के, अमरावती ४५.६३ टक्के, हिंगोली ४९.१३ टक्के, नांदेड ५०.०४ टक्के, परभणी ४८.४५ टक्के, बीड ४६.२९ टक्के, उस्मानाबाद ४६.१३ टक्के, लातूर ४८.१० टक्के आणि सोलापूर ४१.४७टक्के
जम्मू-काश्मीरमध्ये दुपारी ३ पर्यंत ३८.५ टक्के मतदान
> प. बंगालमध्ये दुपारी ३ पर्यंत ६५.४३ टक्के मतदान