राज्यातील या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता

0

पुणे :- येत्या २० ते २१ फेब्रुवारी दरम्यान काही भागांमध्ये वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाची स्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्या स्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली आणि पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.