राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस जोरदार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. तर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यतील मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चांगलाच पाऊस पडला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

तर पुढील 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर यामुळे राज्यात पुढील २ ते ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर राज्यातील जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड , रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्यांमध्ये हा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील मुंबई भागात ढगाळ वातावरणसह असून पाऊस पडला आहे. तर पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर औरंगाबादमध्ये ही ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here