मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासात राज्यात ३२१४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. तर मागील २४ तासात राज्यात 1 हजार 925 रुग्णांची कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 69 हजार 631 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५०.०९ टक्के एवढे झाले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ३९ हजार १० नमुने पॉझिटिव्ह (१७.३१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ५ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २४८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के एवढा आहे.
गेल्या ४८ तासात नोंद झालेल्या ७५ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-४२, भिवंडी-निजामपूर मनपा-१, धुळे मनपा-१, पुणे-१, पुणे मनपा-८, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-१, सातारा-१, सांगली-१, रत्नागिरी-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद-८, अकोला -१, अमरावती मनपा-१, यवतमाळ-१, बुलढाणा-२ अशाप्रकारे जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील मृत्यूंची नोंद झाली आहे.