राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20 वर पोहोचली

0

नागपूर : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरात आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. नागपुरात आता एकूण चार कोरोनाग्रस्त रुग्ण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. तर देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होऊन 84 झाली आहे.

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जवळपास पाच हजार लोकांचा यात मृत्यू झालाय. तर, सव्वालाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झालीय.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार (WHO Declare Corona As Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. ‘या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल’, (WHO Declare Corona As Pandemic) असं WHO ने सांगितलं.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

पुणे – 10

नागपूर – 4

मुंबई – 4

ठाणे – 1

अहमदनगर – 1

Leave A Reply

Your email address will not be published.