राज्यातील किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 होण्याची शक्यता

0

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ मे पर्यंतकडक संचारबंदी लागण्यात आले आहे. तरी देखील नागरिकांची गंदी अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.  दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येणार आहे. किराणा माल आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. “येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्थरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

“किराणा दुकान दिवसभर उघडं राहतं. त्यामुळे किराणा दुकानाच्या नावाने अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यासाठी अजित पवार यांनी सकाळी 7 ते 11 असे चार तास किराण्यासाठी ठेवूयात, असं सांगितलं. कारण दिवसभर किराण्याच्या नावाखाली बाहेर पडणं योग्य नाही. त्यामुळे अशा स्वरुपाचा बद केला पाहिजे. विशेष म्हणजे वरुनच तो बदल व्हावा. कलेक्टरच्या लेव्हलवर तो बदल ठेवू नये, असा निर्णय सर्वानुमते झाला”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक अॅक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, असा निर्णय झाला”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.