राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ३२०२ वर

0

मुंबई । देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. राज्यात काल दिवसभरात 286 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या  ३२०२ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत ३०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर, मृतांची संख्या १९४ झाली आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझॣटिव्ह आढळले आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.त्यांच्या मार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णासाठी तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल.त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत.

राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील ८३ ट्कके मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत. राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा 2 दिवसांवरून 6 दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहेअसं टोपे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.